महिलांच्या सात थरांचा विश्वविक्रम; पार्ले स्पोर्ट्स क्लबला सन्मानपत्र

विलेपार्ले :- पार्ले स्पोर्ट्स क्लब दहीहंडी पथकाने महिलांचे सलग सात थर रचत विश्वविक्रम नोंदवला आहे. या कामगिरीची दखल World Record Book of India या संस्थेने घेत पार्ले स्पोर्ट्स क्लबला अधिकृत प्रमाणपत्र प्रदान केले.हिंदू नववर्षानिमित्त विलेपार्ले येथे आयोजित शोभा यात्रेदरम्यान पार्लेकरांच्या उपस्थितीत हा सन्मान सोहळा पार पडला. या वेळी वरून सरदेसाई आणि संजय उपाध्याय यांच्या हस्ते प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. कार्यक्रमाला जनसेवा समितीचे पदाधिकारी मिलिंद करमरकर आणि गिरीश कुलकर्णी उपस्थित होते. पार्ले स्पोर्ट्स क्लबच्या या ऐतिहासिक यशाबद्दल स्थानिक स्तरावरून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. ही माहिती सामाजिक कार्यकर्ते व महाराष्ट्र राज्य दहीहंडी गोविंदा असोसिएशनचे सदस्य शिवाजी खैरनार यांनी दिली.



Popular posts from this blog

जोगेश्वरीत रामनवमी 2026 जल्लोषात; ढोल-ताशांच्या गजरात भक्तीमय वातावरण

देवके गावच्या कलाकारांची जिद्द आणि विलेपार्लेचे 'दीनानाथ' : एक अविस्मरणीय प्रयोग!