Posts

Showing posts from April, 2026

श्रीधर फडके यांच्या सुवर्ण महोत्सवी कारकिर्दीनिमित्त “येथोनि आनंदु रे” कार्यक्रम कल्याणमध्ये यशस्वी

Image
मुंबई ( प्रतिनिधी ) : - सुप्रसिद्ध संगीतकार, गायक आणि लोकाभिमुख व्यक्तिमत्व श्रीधर फडके यांच्या अमृत महोत्सवानिमित्त त्यांचा पाच दशकांचा सुवर्ण महोत्सवी सांगीतिक प्रवास दर्शवणारा “येथोनि आनंदु रे” हा कार्यक्रम कल्याण येथील अत्रे रंगमंदिरमध्ये रसिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात पार पडला. सुस्वर क्रिएशन्स (संचालिका सुकन्या जोशी), अक्षरमंच सामाजिक सांस्कृतिक प्रतिष्ठान (संस्थापक योगेश जोशी) आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिका शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमात श्रीधर फडके यांनी संगीतबद्ध केलेल्या लोकप्रिय रचना शिल्पा पुणतांबेकर, शेफाली कुलकर्णी साकुरीकर, सुराज सोमण यांनी सादर केल्या. तसेच श्रीधर फडके यांनी ओंकार स्वरूपा, जय शारदे, तुला पाहिले मी, तोच मी, फिटे अंधारचे जाळे ही गाणी सादर करून रसिकांना अविस्मरणीय सांगीतिक अनुभव दिला. श्रीधर फडके यांनी संगीतबद्ध केलेले हिंदू सामर्थ्य गीत आणि डॉ. दीपक वझे लिखित, शंकर महादेवन गायलेले गीत स्क्रीनवर प्रदर्शित करण्यात आले, ज्याला रसिकांची विशेष दाद मिळाली. निवेदिका सुकन्या जोशी यांनी त्यांच्या निवेदनातून श्रीधर फडके यांचा सुवर...

डोंबिवलीत जेष्ठ नागरिकांना शुगर-फ्री पॅकेट्सचे विनामूल्य वितरण

Image
मुंबई ( प्रतिनिधी ) :-  जनजागृती सेवा संस्थेच्या वतीने मधुमेहग्रस्त जेष्ठ नागरिकांसाठी शुगर-फ्री पॅकेट्सचे विनामूल्य वितरण करण्यात आले. हा उपक्रम सिद्धिविनायक मंदिर तसेच सावळाराम महाराज क्रीडा संकुल येथे पार पडला. या कार्यक्रमाला परिसरातील अनेक जेष्ठ नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत लाभ घेतला. मधुमेह नियंत्रणासाठी आवश्यक असलेल्या शुगर-फ्री पॅकेट्समुळे जेष्ठांच्या आरोग्याची काळजी घेण्याचा संस्थेचा प्रयत्न असल्याचे यावेळी सांगण्यात आले. कार्यक्रमावेळी गुरुनाथ तिरपणकर, दत्ता कडुलकर, अरविंद सुर्वे, जयेश दाभोळकर, बाळकृष्ण देसाई आणि मंगेश खोत उपस्थित होते. या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी अरविंद सुर्वे यांचे विशेष सहकार्य लाभल्याचे संस्थेच्या वतीने नमूद करण्यात आले.

देवके गावच्या कलाकारांची जिद्द आणि विलेपार्लेचे 'दीनानाथ' : एक अविस्मरणीय प्रयोग!

Image
मुंबई ( गोरेगाव प्रतिनिधी ) :-  विलेपार्ले येथील दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह म्हणजे मराठी रंगभूमीचा एक देदिप्यमान इतिहास. या मंचावर आजवर असा एकही मोठा अभिनेता किंवा अभिनेत्री नसेल, ज्याने आपली कला सादर केली नाही. पण याच ऐतिहासिक मंचावर जेव्हा 'देवके' गावची माणसं एकत्र येतात आणि 'हाउसफुल'चा बोर्ड लावतात, तेव्हा तो क्षण सुवर्णअक्षरांनी लिहिण्यासारखा असतो.  दी नानाथ नाट्यगृहाच्या कणाकणात एक वेगळीच ऊर्जा आहे. इथे वाजणारी नाटकाची तिसरी घंटा आणि त्यानंतर चोखंदळ रसिक प्रेक्षकांनी दिलेली दाद, ही कोणत्याही कलाकारासाठी जगातल्या सर्वोच्च पुरस्कारापेक्षा मोठी असते. या वास्तूत नाटक गाजवणं हे सोपं नसतं.काहीतरी घडतंय इथं' हे नाटक केवळ रंगमंचावरील कलाकारांचे नव्हते, तर ते पडद्यामागे अहोरात्र कष्ट घेणाऱ्या प्रत्येक हाताचे यश आहे. रं गमंचावर वावरणारे देवके गावचे कलाकार असोत किंवा नेपथ्य, प्रकाशयोजना आणि संगीत सांभाळणारे पडद्यामागील पडदेकरी; प्रत्येकाने आपल्या रक्ताचे पाणी करून हा प्रयोग उभा केला. तालीम ते प्रत्यक्ष सादरीकरण या प्रवासात सर्वांची मेहनत दिसून आली. म्हणूनच या प्रयोगाने दीना...

"मुंबईत ‘फेक पोलीस’चा धक्कादायक प्रकार"; महिलेला धमकावून पैसे उकळणारी टोळी गजाआड

" पोलीस नावाखाली फसवणूक; आरे पोलिसांची दमदार कारवाई, ५ आरोपी अटकेत"  गोरेगाव (प्रतिनिधी ) :- पोलीस असल्याची खोटी बतावणी करून एका गृहिणीला धमकावत दोन लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा आरे पोलिसांनी पर्दाफाश करत २ महिलांसह ५ जणांना अटक केली आहे. पोलिसांच्या सूत्रांच्या अधिक माहितीनुसार, आरोपींनी पीडित महिलेशी संपर्क साधून स्वतःला पोलीस असल्याचे भासवले. ड्रग्स तसेच वेश्या व्यवसायाच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची भीती दाखवत त्यांनी महिलेला मानसिक दबावाखाली ठेवले. त्यानंतर ऑनलाईन लिंक पाठवून पैशांचा व्यवहार करण्यास भाग पाडत तिच्याकडून दोन लाख रुपये उकळले. फसवणुकीची बाब लक्षात येताच पीडितेने आरे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार गु.र.क्र. ४८/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम २०४, २०५, ३०८(६),  ३५१(३), ३(५) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला. गुन्हे प्रकटीकरण अधिकारी सचिन पांचाळ यांनी तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपींच्या हालचालींचा माग काढत टोळीचा छडा लावला. सदर तपासादरम्यान आरोपींनी बनावट ओळख वापरून गुन्हा केल्याचे उघड झाले. आरे पोलिसांनी सापळा रचून २ महिलांसह ५ आरोपींना अटक...

सेंट्रल रेल्वे तिकीट चेकिंग स्टाफ वेल्फेअर ट्रस्टकडून प्रवाशांसाठी व्हीलचेअर वाटप

Image
मुंबई ( प्रतिनिधी ) :- सेंट्रल रेल्वे तिकीट चेकिंग स्टाफ वेल्फेअर ट्रस्ट (मुंबई) यांनी ३९ व्या वर्षात पदार्पणाच्या निमित्ताने “एक हात मदतीचा” या सामाजिक उपक्रमांतर्गत प्रवाशांच्या सेवेसाठी महत्त्वपूर्ण पुढाकार घेतला आहे. ट्रस्टच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर, ठाणे, कल्याण, लोकमान्य टिळक टर्मिनस आणि पनवेल या सहा प्रमुख स्थानकांना प्रत्येकी एक अशा एकूण सहा व्हीलचेअर्सचे वितरण करण्यात आले. या उपक्रमासाठी लायन्स क्लब ऑफ गार्डन व्ह्यू, मुंबई, श्री स्वामी नारायण मंदिर, कल्याण आणि रोटी डे ग्रुप, कल्याण यांचे सहकार्य लाभले. ट्रस्टचे सेवानिवृत्त ट्रस्टी एस. जी. दिक्षित यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे आयोजित कार्यक्रमात लायन्स क्लबचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर फिरोज कात्रक, फर्स्ट व्हाइस डिस्ट्रिक्ट गव्हर्नर पवन कुमार अग्रवाल, नितिनभाई (रोटी डे ग्रुप), दिनेश ठक्कर (स्वामी नारायण, कल्याण) तसेच रेल्वेचे अधिकारी प्रकाश कनोजिया (SRDCM-Works), चंद्रकांत पगारे (स्टेशन डायरेक्टर, CSMT), पंकज कुमार (ACM TC), प्रदीप कोरी (DCTI, मुंबई) यांची प्रमुख...