राज्यस्तरीय व्यसनमुक्ती कार्यक्रमासाठी अमोल मडामे यांची मुख्य समन्वयकपदी निवड

 मुंबई :- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या आठव्या राज्यस्तरीय व्यसनमुक्ती साहित्य संमेलनासह ‘राष्ट्रपिता महात्मा गांधी व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार २०२६’ या कार्यक्रमासाठी नशाबंदी मंडळ, महाराष्ट्र राज्यचे मुख्य संघटक-चिटणीस अमोल स. भा. मडामे यांची मुख्य समन्वयकपदी निवड करण्यात आली आहे. व्यसनमुक्ती क्षेत्रात सातत्याने केलेल्या कार्याची दखल घेत ही जबाबदारी मडामे यांच्यावर सोपविण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे नशाबंदी मंडळाच्या कार्याला राज्यस्तरावर मान्यता मिळाल्याची भावना व्यक्त केली जात आहे. दरम्यान, सदर कार्यक्रम २५ व २६ मार्च २०२६ रोजी मुंबई येथे आयोजित करण्यात येणार असून, विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. व्यसनमुक्तीबाबत जनजागृती, साहित्यिक चर्चासत्रे आणि उत्कृष्ट कार्य करणाऱ्यांचा सन्मान असे विविध उपक्रम या संमेलनात पार पडणार आहेत.



Popular posts from this blog

जोगेश्वरीत रामनवमी 2026 जल्लोषात; ढोल-ताशांच्या गजरात भक्तीमय वातावरण

देवके गावच्या कलाकारांची जिद्द आणि विलेपार्लेचे 'दीनानाथ' : एक अविस्मरणीय प्रयोग!

महिलांच्या सात थरांचा विश्वविक्रम; पार्ले स्पोर्ट्स क्लबला सन्मानपत्र