गांधी बालमंदिर हायस्कूलमध्ये ‘स्टीम फ्युचरेस्टिक रोबोटिक लॅब’चे उद्घाटन

मुंबई :- कुर्ला येथील गांधी बालमंदिर हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांच्या तांत्रिक आणि वैज्ञानिक कौशल्यविकासाला चालना देण्यासाठी ‘स्टीम'- फ्युचरेस्टिक रोबोटिक लॅब’चे उद्घाटन उत्साहात पार पडले. युवा अनस्टॉपेबल यांच्या वतीने आयोजित या उपक्रमाचे उद्घाटन अनुभा गुप्ता, सत्यम, धनश्री, कला मस्ते आणि प्रदीप यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमावेळी मुख्याध्यापक अनिल पांचाळ उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांसाठी रोबोटिक्स आणि आधुनिक तंत्रज्ञानाशी संबंधित विविध प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. या प्रात्यक्षिकांमुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली असून त्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. नवीन लॅबमुळे विद्यार्थ्यांना विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित (STEAM) या क्षेत्रातील ज्ञान प्रत्यक्ष अनुभवातून मिळणार असून त्यांच्या भविष्यासाठी ही सुविधा उपयुक्त ठरेल, असा विश्वास प्रमुख अतिथींनी व्यक्त केला. कार्यक्रमाच्या शेवटी मुख्याध्यापक अनिल पांचाळ यांनी सर्व प्रमुख अतिथी व आयोजकांचे आभार मानले. या कार्यक्रमास शिक्षक रत्नकांत विचारे, विश्वनाथ पांचाळ, अवधूत चव्हाण, अमोल जागले, घनश्याम जोशी, संगणक शिक्षक उत्तम साळवी, क्लर्क गीतेश सोनवणे तसेच विश्वास साळवी उपस्थित होते.



Popular posts from this blog

जोगेश्वरीत रामनवमी 2026 जल्लोषात; ढोल-ताशांच्या गजरात भक्तीमय वातावरण

देवके गावच्या कलाकारांची जिद्द आणि विलेपार्लेचे 'दीनानाथ' : एक अविस्मरणीय प्रयोग!

महिलांच्या सात थरांचा विश्वविक्रम; पार्ले स्पोर्ट्स क्लबला सन्मानपत्र