सेंट्रल रेल्वे तिकीट चेकिंग स्टाफ वेल्फेअर ट्रस्टकडून प्रवाशांसाठी व्हीलचेअर वाटप

मुंबई ( प्रतिनिधी ) :- सेंट्रल रेल्वे तिकीट चेकिंग स्टाफ वेल्फेअर ट्रस्ट (मुंबई) यांनी ३९ व्या वर्षात पदार्पणाच्या निमित्ताने “एक हात मदतीचा” या सामाजिक उपक्रमांतर्गत प्रवाशांच्या सेवेसाठी महत्त्वपूर्ण पुढाकार घेतला आहे. ट्रस्टच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर, ठाणे, कल्याण, लोकमान्य टिळक टर्मिनस आणि पनवेल या सहा प्रमुख स्थानकांना प्रत्येकी एक अशा एकूण सहा व्हीलचेअर्सचे वितरण करण्यात आले. या उपक्रमासाठी लायन्स क्लब ऑफ गार्डन व्ह्यू, मुंबई, श्री स्वामी नारायण मंदिर, कल्याण आणि रोटी डे ग्रुप, कल्याण यांचे सहकार्य लाभले. ट्रस्टचे सेवानिवृत्त ट्रस्टी एस. जी. दिक्षित यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात आला.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे आयोजित कार्यक्रमात लायन्स क्लबचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर फिरोज कात्रक, फर्स्ट व्हाइस डिस्ट्रिक्ट गव्हर्नर पवन कुमार अग्रवाल, नितिनभाई (रोटी डे ग्रुप), दिनेश ठक्कर (स्वामी नारायण, कल्याण) तसेच रेल्वेचे अधिकारी प्रकाश कनोजिया (SRDCM-Works), चंद्रकांत पगारे (स्टेशन डायरेक्टर, CSMT), पंकज कुमार (ACM TC), प्रदीप कोरी (DCTI, मुंबई) यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष डी. व्ही. चिंदरकर, सचिव हरिश मोंडकर, खजिनदार गिरिश कदम, उपाध्यक्ष अभय कांबळे तसेच ट्रस्टी शेखर तांबे, बाला पिल्लाई, आर. एम. बिरवटकर, प्रसाद करलकर, लीना गोरडे, सुचिता साळवी यांसह सदस्य सचिन सावंत व दीपक पापन उपस्थित होते. या उपक्रमामुळे ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग आणि गरजू प्रवाशांना स्थानकांवर सुलभ सेवा मिळण्यास मोठी मदत होणार आहे.



Popular posts from this blog

जोगेश्वरीत रामनवमी 2026 जल्लोषात; ढोल-ताशांच्या गजरात भक्तीमय वातावरण

देवके गावच्या कलाकारांची जिद्द आणि विलेपार्लेचे 'दीनानाथ' : एक अविस्मरणीय प्रयोग!

महिलांच्या सात थरांचा विश्वविक्रम; पार्ले स्पोर्ट्स क्लबला सन्मानपत्र